Wednesday, 1 February 2017

कलचाचणी

कलचाचणी

शाळा व शिक्षक नोंदणी चालू झाली आहे

कलचाचणी साठी शाळा, शिक्षक आणि संगणक प्रयोगशाळा माहिती भरण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

1) mh-ssc.ac.in उघडा.
तुम्हाला कलचाचणी 2017 ची सविस्तर माहिती दिसू लागेल.
माहिती च्या खाली log in होण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

2) प्रथम शाळेची माहिती भरा. त्यासाठी शाळेचे नाव, शाळा संकेतांक, दूरध्वनी, मेल, मुख्याध्यापकाचे नाव, शाळेची वेळ भरावी लागणार आहे. Next वर क्लिक करा.

3) आता शिक्षकाची माहिती भरायची आहे.
त्यासाठी शाळेचा udise नंबर, शिक्षकाचे नाव, दूरध्वनी, मेल, whatsapp नंबर, विषय, आदी माहिती नोंदवून त्या शिक्षकाचा पासवर्ड तयार करायचा आहे. हा पासवर्ड वापरून यापुढील कामासाठी log in व्हावे लागणार असल्याने तो लिहून ठेवावा तसेच गोपनीय ठेवावा.
Next वर क्लिक करा.

4) आता संगणक प्रयोग शाळेची मीहिती भरा.
त्यासाठी
10 वी ची विद्यार्थी संख्या, संगणक संख्या, नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा आहे का इत्यादी माहिती भरावयाची आहे.

सर्व माहीती भरून झाल्यावर *submit* बटणावर क्लिक करा. तुमच्या शाळेची नोंदणी झाल्याचा संदेश येईल.

5) ट्रायल पाहण्यासाठी log in क्लिक करा. आता तुम्हाला school index No. आणि password चा बॉक्स दिसू लागेल. त्यात माहिती भरून log in व्हा. तुम्हाला कलचाचणी विषयी आणि तुमच्या शाळेची सविस्तर माहिती दिसू लागेल.

महत्वाचे:

कलचाचणी विषयी अडचण आल्यास तुम्ही वरील वेबसाईला वेळोवेळी भेट द्या. तिथे तुम्हाला दैनंदिन अपडेट आणि मदत मिळू शकेल.

No comments:

Post a Comment