Saturday, 14 January 2017

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *बाफनविहिर* केंद्र- देवडोंगरा










*.....शिक्षक सहभागातून बाफनविहिर शाळा झाली मोबाईल डिजिटल....*

आज दिनांक 12/1/2017 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *बाफनविहिर* केंद्र- देवडोंगरा येथे शिक्षक सहभागातून साकारलेल्या  *मोबाईल डिजिटल स्कूल* चे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.रमेश तुंबड़े यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 
बाफनविहीर गावचे उपसरपंच मा. श्री प्रल्हाद बाम्हणे , आशा कार्यकर्ती मा. श्रीम. कौशल्या सुदाम पागी, मुख्याध्यापक श्री .दळवी सर व सर्व शिक्षक वृंद  व ग्रामस्थ उपस्थित होते .
        देवडोंगरा बीटाचे विस्तार अधिकारी मा.श्री. *एम.आर.चव्हाण साहेब*व केंद्रप्रमुख मा.श्री. *एन.बी.मोरे साहेब* यांच्या मार्गदर्शनानुसार बाफनविहिर शाळेतील सर्व 6 शिक्षकांनी प्रत्येकी *1000 रुपये* खर्च करून *मोबाईल एनलार्ज स्क्रीन (F2)3D- 6 संच* व  *3G ब्लूटूथ स्पीकर- 6 संच* इ.  खरेदी करुन विद्यार्थ्याना ही सुविधा उपलब्ध करुन दिली.
 लोकसहभागातून डिजिटल स्कूल साकारण्याचे काम नियोजित असून तोपर्यंत विद्यार्थ्याना दृक्-श्राव्य माध्यमातून आनंददायी शिक्षण मिळावे म्हणून शिकाकांनी सामाजिक बांधिलकिचे भान ठेवून स्व- खर्चातुन मोबाईल डिजिटल स्कूल साकारले.
 सदर कार्यक्रमानंतर *मोबाईल डिजीटल स्कूल* चे *प्रात्यक्षिक* उपस्थित ग्रामस्थ
 व विद्यार्थी यांना दाखविण्यात आले. या योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ यांनी शिक्षकांचे आभार मानले.
📱📲📲📲📲📲📲📲📲📲



No comments:

Post a Comment